Monday, May 11, 2020

ठेव


Diary Excerpt - 3

पती-पत्नीचं - स्त्री-पुरूषाचं नातं, हे एक वेगळंच तंत्र आहे. त्यात आकर्षण आहे, विकर्षण आहे. ओढ असते, चीडही येते. निमंत्रण असतं, अस्विकारही असतो. स्ववलंबन मागणारं परावलंबित्व असतं. स्त्री-पुरुष नात्यातला हा एक मधूर तणाव असतो. म्हणूनच त्यांच्यातला विरोध टिकला पाहिजे. बाईचं पुरूषीकरण होता कामा नये. निसर्गाच्या ह्या निमिर्तीला तोड नाही. त्यानं स्त्री आणि पुरुष सवंगडी म्हणून निर्माण केले. हा भाव मनात ठेवून दोघांनी एकमेकांना 'ठेव' म्हणून जपलं, तर स्वर्ग इथंच उतरतो.
               
                                                                    - व. पू. काळे (सखी)

No comments: