Wednesday, May 27, 2020

काॅपी


Diary Excerpt - 5

कोणीही कुणाचीही काॅपी नसतो. परमेश्वर, निसर्ग पुनरुक्ती करत नाही. त्याची प्रतिभा आटलेली नाही. आणखी जास्त चांगला पूर्णपुरूष आपण घडवणार आहोत, असं तो प्रत्येक जीव जन्माला घालताना सांगतोय.
                                                         -  व. पू. काळे


Monday, May 18, 2020

भेट


Diary Excerpt - 4

एक सांगशील
आपले रस्ते अवचित कुठे, कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळण कसे भेटले?
क्षणाभोवती
ही कसली अनोखी रंगत खुलते आहे
जगणं व्हावं गाणं
अशी स्वरांची संगत जुळते आहे
पण खरं सांगू
या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे
जीवघेणं उत्कट असेल
तरीही ते खरं नव्हे
तुझी दिशा पूर्वीच निश्चित
ती बदलणं उचित नाही
माझ्यापुरतं बोलायचं तर
मला माझी दिशाच नाही
तुझ्या संगतीत
आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे
माझा मात्र स्वप्नांच्या हातात
फक्त भंगण्याचाच वसा आहे
म्हणून म्हणतो
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून चटका लावून
निदान दूर होणं तरी असू नये
पण अशाच वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो

Monday, May 11, 2020

ठेव


Diary Excerpt - 3

पती-पत्नीचं - स्त्री-पुरूषाचं नातं, हे एक वेगळंच तंत्र आहे. त्यात आकर्षण आहे, विकर्षण आहे. ओढ असते, चीडही येते. निमंत्रण असतं, अस्विकारही असतो. स्ववलंबन मागणारं परावलंबित्व असतं. स्त्री-पुरुष नात्यातला हा एक मधूर तणाव असतो. म्हणूनच त्यांच्यातला विरोध टिकला पाहिजे. बाईचं पुरूषीकरण होता कामा नये. निसर्गाच्या ह्या निमिर्तीला तोड नाही. त्यानं स्त्री आणि पुरुष सवंगडी म्हणून निर्माण केले. हा भाव मनात ठेवून दोघांनी एकमेकांना 'ठेव' म्हणून जपलं, तर स्वर्ग इथंच उतरतो.
               
                                                                    - व. पू. काळे (सखी)

Saturday, May 09, 2020

पाहुणा (Guest)


Diary Excerpt - 2

I am a huge fan of this one poem in Marathi which describes the human mind brilliantly - its simplicity to its incomprehensibility, its invincibility to its vulnerability, its triviality to its all-encompassing immensity. It sums it up beautifully by saying 'I feel like a guest in my own house (mind)'.


कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी
कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे
कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!
कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे
टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!
कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!

                              – विंदा करंदीकर


Friday, May 08, 2020

Stree


Diary Excerpt - 1

स्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपलया पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निःश्वास  वाटतो मला. त्या निःश्वासात पुरूषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ति असते. स्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो, अपमानाचे कडू घोट धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. तरुण मनाला ज्याची नेहेमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतलं मोक्याचं ठिकाण.
                                                       - मृत्युंजय (शिवाजी सावंत)

Thursday, May 07, 2020

Serendipitous Lockdown

Lockdowns imposed around the world are a boon and a bane
depending on whether one is a glass-half-full or half-empty person.

I too am stuck at home due to the lockdown and I go through
moments of frustration too, for not being able to go out and make the most of my stay in India. It is also a joy though, as it has given me ample time to set up my house that was rented out earlier. That meant opening up various cartons filled with surprises and the joy of finding items whose existence had been long forgotten. I like opening up boxes in general, old and new alike..  think I like new experiences, new things, the scent they carry and the novelty of it. Well, even though the boxes I am opening now are old, covered with dust and musty, they still offered novelty through their forgotten familiarity.

Found a couple of diaries in this pandora's box, the ones I had maintained during school and through college. It was a random collection of sayings, wise words, poems and extracts from books. Reading these again warmed my heart no end and I got lost in them for the next few days.! It gave me a fresh insight into who I was, who I am and who I can be ! Was a nice reminder and a gentle nudge at the same time.

To continue my old, but good, habit of penning down my thoughts and (hopefully-sounding-not-too-pompous) preserve my legacy (LOL)..I decided to reopen my blog and create an online diary. 
Someday, someone is going to find the old, even more mustier diaries, whether hard-bound or online and get a glimpse of an unknown aspect of a person they knew !