Tuesday, June 23, 2009

Another one from my diary


अशी
असावी ती
फुलासारखी नाजूक
तरी काट्यांवरही चालणारी
कमळासारखी कोमल
तरी चिखलातही उमलणारी

अशी असावी ती
माझ्यात सामावून जाणारी
तरी स्वतःचे "मी" पण जपणारी
मुक्त जीवन जगणारी
तरी माझे "मी"पण जपणारी

No comments: